► वृत्तसंस्था/ लंडन
फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडनमधील खासगी तुरुंगात हलवण्यात आले आहे. त्याला आता दक्षिण पश्चिम लंडनमधील टेमसाईड तुरुंगात ठेवण्यात आले असून या तुरुंगातही जास्त कैदी आहेत. मात्र, कारागृहातील सुरक्षेची पातळी तशीच राहणार आहे. नीरव मोदीला ठेवण्यात आलेले हे ब्रिटनमधील सर्वात मोठे आणि गर्दीचे तुरुंग आहे. यापूर्वी त्याला दक्षिण-पश्चिम लंडनमधील वँड्सवर्थ तुरुंगात ठेवण्यात आले होते. या तुरुंगातून नुकताच दहशतवादी डॅनियल खलीफ फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी शोधमोहीम राबवून आता पकडून पुन्हा तुरुंगात टाकण्यात आले आहे.
नीरव फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात भारतात हवा आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या अंदाजे 2 अब्ज डॉलर्सच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी गेल्यावषी ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या विरोधात कायदेशीर लढाई हरला होता