माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांचा उपक्रम
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सव काळात निर्माल्य कुंडाची नितांत गरज असते. गणेशोत्सवात भक्तीभावाने पूजन केल्यानंतर निर्माल्य कोठेही फेकले जाते. मात्र आता त्यासाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी फिरते निर्माल्य कुंड सुरू केले आहे. गेल्या सात वर्षांपासून ही सेवा सुरू आहे.
अनगोळ, भाग्यनगर, चिदंबरनगर, विद्यानगर, इंदिरानगर, संत रोहिदासनगर, कोनवाळ विभाग, कृषी कॉलनी, आनंदनगर या सर्व परिसरात हे निर्माल्य कुंड फिरविण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी अनगोळ, शिवशक्तीनगर येथील सिद्धिविनायक मंदिर येथून सुरुवात झाली. मंदिरामध्ये गणपतीची आरती झाली. विनायक गुंजटकर दाम्पत्यातर्फे निर्माल्य कुंड फिरत्या वाहनाचे पूजन झाले. हे वाहन सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अनगोळ परिसरात निर्माल्य जमा करणार आहे.