हैदराबाद
सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनएमडीसी लिमिटेडने गेल्या नोव्हेंबर महिन्यात 36.1 लाख टन लोह खनिजाचे उत्पादन घेतल्याची माहिती आहे. सदरच्या उत्पादनात कंपनीने याखेपेस 8 टक्के इतकी वाढ दर्शवली आहे. तर दुसरीकडे विक्रीदेखील 5 टक्के वाढीसह 30.4 लाख टन इतकी राहिली आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये सरासरी लोहखनिज उत्पादनात उत्साहवर्धक स्थिती राहिली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.