तरुणभारत ऑनलाइन टीम
सोन्याच्या दागिन्यांना आता शुद्ध झळाळी मिळणार आहे कारण सोने खरेदी विक्री साठी आता नवीन नियम लागू होणार आहेत एक जून पासून हा नवीन नियम लागू होणार असून सोन्याच्या दागिन्यांना शुद्धतेची हमी मिळणार आहे सोने विक्रेत्यांना आता हॉलमार्क शिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत मात्र ग्राहक यापूर्वीचे जुने दागिने सोनारांना हॉलमार्क शिवाय विकू शकणार आहेत.
पहिल्या टप्प्यात देशातील 256 जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी होणार असून त्यावर ग्राहक व्यवहार मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलेले आहे हॉलमार्किंग करण्याच्या दुसऱ्या टप्प्यात सोन्याच्या दागिन्यांचे तीन अतिरिक्त कॅरेट तयार केले जाणार आहेत त्यामध्ये २० २३ आणि २४ कॅरेटमध्ये सोने करण्यात आले आहे पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर तपासणी आणि हॉलमार्क केंद्र ए एच सी स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खरंतर हा नियम 16 जून 2021 रोजी लावण्यात येणार होता मात्र सरकारने टप्प्याटप्प्याने हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याचा ग्राहकांना काय फायदा होणार हेही जाणून घेऊया
गोल्ड हॉलमार्किंगचे नियम फक्त सोने विक्रेत्यांना लागू असणार आहेत ते ग्राहकांना लागू नाहीत.ज्वेलर्स आता ग्राहकांना हॉल मार्क शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही पण ग्राहक आपले जुने दागिने सोने विक्रेत्यांना हॉलमार्क शिवाय देऊ शकतो त्यामुळे या नवीन नियमाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.