सांगली : प्रतिनिधी
सांगली- मिरजेतील पाणी पुरवठ्यासाठी अखंडित वीज पुरवठा केला जाईल अशी ग्वाही महापालिकेत उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वीज वितरण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सांगली- मिरजेमध्ये खंडीत वीजपुरवठ्यामुळे पाणी पुरवठ्याला अडचणी येत आहेत. यासाठी मनपा आयुक्त सुनील पवार यांनी महावितरणचे अधिकारी आणि पाणीपुरवठ्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत पाणी पुरवठ्यासाठी अखंडित वीज केला जाईल तसेच आणि यापुढे विजेअभावी पाणीपुरवठा खंडित होणार नाही, एक्स्प्रेस फिडरचा वीजपुरवठा 24 तास सुरू ठेवला जाईल अशी ग्वाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांना दिली.
तसेच जॅकवेल, माळ बंगला आणि हिराबाग जलशुध्दीकरण केंद्राचा वीज पुरवठा एकाच फिडरवर जोडण्याचा निर्णयही मनपा आणि महावितरण अधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला. मनपा आयुक्त सुनील पवार यांच्या सूचनेनसार ही बैठक घेण्यात आली. तर अशुद्ध आणि अपुरा पाणीपुरवठा होणार नाही तसेच नियमित पाणीपुरवठा करावा याबाबत नियोजन करण्याचे आदेश आयुक्त सुनील पवार यांनी पाणीपुरवठा विभागाला यावेळी दिले.