नवी दिल्ली
एचएमडी ग्लोबलने अलीकडेच नोकिया 105 क्लासिक हा फोन भारतीय बाजारात सादर केला आहे. यामध्ये फिचर फोनसह युपीआय अॅप्लिकेशनची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदरचा फोन हा चार प्रकारांमध्ये उपलब्ध होणार असून यामध्ये सिंगल सिम, डबल सिम, चार्जरसह व चार्जरशिवाय, बेसिक मॉडेल राहणार आहे. ज्यामध्ये सिंगल सिम आणि चार्जर दिलेला नसून याची किंमत ही 999रुपये इतकी राहणार असल्याची माहिती आहे.