नवी दिल्ली
एचएमडी ग्लोबल आणि नोकिया यांनी भारतात आपला नवीन फ्रेंडली स्मार्टफोन सी 32 सादर केला आहे. सी 32 ची किंमत ही साधारणपणे 8,999 रुपये राहणार असल्याची माहिती आहे. यामध्ये अँड्रॉईड13 प्रणाली ओएस देण्यात आल्याची माहिती आहे. नोकिया सी 32 मध्ये आपणास 50 एमपी डबल कॅमेरासह अन्य सुविधा मिळणार असल्याची माहिती आहे. भारतीय ग्राहकांना हा मोबाईल पहावयाचा असल्यास नोकिया सी32 हा भारतातील रिटेल स्टोअर व कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
अन्य फिचर्स :
?4जीबी रॅम आणि 64 जीबी अंतर्गत स्टोरेज
?6.5 इंच आकाराचा एचडी डिस्प्ले मिळणार
?हा फोन ऑक्टाकोर चिपसेटसोबत येणार