रशियाला शस्त्रs पुरविल्याचाही आरोप ः यावर्षीचे 36 वे क्षेपणास्त्र परिक्षण
वृत्तसंस्था/ बिजिंग
उत्तर कोरीया या देशाने जपानच्या समुद्रात क्षेपणास्त्रे डागल्याने येथील तणावात भर पडली आहे. उत्तर कोरीयाने याठिकाणी दोन लघु पल्ल्यांच्या क्षेपणास्त्राचे परिक्षण केले. या देशाचे या वर्षीचे हे 36 वे क्षेपणास्त्र परिक्षण होते, असे स्पष्ट करण्यात आले. हे परिक्षण निर्मनुष्य क्षेत्रात करण्यात आले.
काही काळापूर्वी जपानी समुद्रात अमेरिका आणि दक्षिण कोरीया या देशांनी सामाईक अभ्यास केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरीयाने ही क्षेपणास्त्र चाचणी केली, असे तज्ञांचे मत आहे. उत्तर कोरीया रशियाला शस्त्र सामुर्गी पुरवित आहे, असा आरोप अमेरिकेने केल्यानंतर काही वेळातच ही क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली. अमेरिकेचा आरोपही उत्तर कोरीयाच्या सरकारी वृत्तमाध्यमांनी फेटाळला आहे. अमेरिका आपल्या राजकीय फायद्यासाठी काल्पनिक कथा पसरवित आहे, असे दक्षिण कोरीयाचे म्हणणे आहे.
तणावात वाढ
गेले वर्षभर उत्तर कोरीयन अनेक क्षेपणास्त्र चाचण्या केल्यामुळे दक्षिण कोरीयाने चिंता व्यक्त केली आहे. उत्तर कोरीया युद्धाची तयारी करीत आहे, असा आरोप करत दक्षिण कोरीयाने आपली सामरीक सज्जता वाढविण्यास प्रारंभ केला आहे. उत्तर कोरीयाच्या आक्रमक क्षेपणास्त्र परिक्षणामुळे या भागात तणाव वाढला आहे.
18 डिसेंबरला परिक्षण
उत्तर कोरीयाने आपले नवे क्षेपणास्त्र परिक्षण 18 डिसेंबरला केले होते. याची माहिती 20 डिसेंबरला देण्यात आली. दक्षिण कोरीयाने या चाचणीचा निषेध केला असून उत्तर कोरीया जगात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे जगावर महागाईचे संकट ओढावले आहे. त्यातच जपानी समुद्रात युद्ध सुरु झाल्यास परिस्थिती कठीण होईल, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे.
500 किमीचा पल्ला
उत्तर कोरीयाने परिक्षण केलेल्या क्षेपणास्त्रांचा पल्ला साधरणतः 500 किमीचा होता, असे स्पष्ट करण्यात आले. हि क्षेपणास्त्रे जपानच्या आर्थिक क्षेत्राच्या बाहेर समुद्रात कोसळली. त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. तथापी, सातत्यपूर्ण क्षेपणास्त्र परिक्षणे उत्तर कोरीयाकडून होत असल्याने या देशाच्या हेतू विषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर कोरीयाजवळ किमान 6 आणि जास्तीत जास्त 10 अणवस्त्रे असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिक्षण केलेल्या क्षेपणास्त्रांची अणवस्त्रs वाहून नेण्याची क्षमता होती का? याबद्दल वाद आहे. उत्तर कोरीयाला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान कोणी पुरविले, हाही वादाच विषय आहे.