Stylish Tops That Match With Saree : कोणत्याही सण समारंभात किंवा कार्यक्रमात घाईघाईत मॅचिंग ब्लाउज तयार करणे हे मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत तुम्हाला साडी नेसण्याची तुमची इच्छा सोडण्याची गरज नाही, तर मॅचिंग ब्लाउजशिवाय तुमचे काम होऊ शकते. तुम्ही काही टॉप ट्राय करू शकता, जे प्रत्येक साडीसोबत चांगले जातात. चला तर मग जाणून घेऊयात हे कोणते टॉप्स आहेत.
टर्टल नेक टॉप
काळ्या रंगाचा टर्टल नेक टॉप कोणत्याही साडीवर मॅच होतो. शिवाय तुमचा लुक ही स्टायलिश दिसतो.पार्टी किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी हा लुक कलासी दिसतो.आजकाल हा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर चालत आहे. म्हणूनच अशा पद्दतीचा एक टॉप तुमच्याजवळ नक्की असायला हवा.
रफल टॉप
कोणत्याही कॉटन किंवा सिल्क साडीवर तसेच फ्युजन टचमध्ये साडी नेसायची असेल तर रफल टॉप उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुमची स्टाईल खूप यूनिक दिसेल.
पफ स्लीव्हज टॉप
तुम्हाला ग्रेसफुल लूक देण्यासाठी पफ स्लीव्हज टॉप देखील उत्तम पर्याय आहे. या प्रकारच्या टॉपसह तुमचा लूक एकदम वेगळा दिसतो. तुमचे हात खूप जाड किंवा खूप पातळ असल्यास, पफ स्लीव्हज वरचा भाग झाकतात.
टँक टॉप
साडीसोबत टीमअप करण्यासाठी टँक टॉप हा देखील चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला हेवी एथनिक लूक आवडत नसेल तर तुम्ही टँक टॉप ट्राय करू शकता. यामध्येही तुमचा लुक खूपच वेगळा दिसेल.