25 ऑगस्टपासून तीन अनारक्षित एक्स्प्रेस
प्रतिनिधी */बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेने मिरज येथून तीन अनारक्षित एक्स्प्रेस धावणार असल्याचे अखेर जाहीर केले. मिरज-हुबळी, मिरज-कॅसलरॉक, मिरज-लोंढा या तीन एक्स्प्रेस 25 ऑगस्टपासून धावणार आहेत. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेकडून रेल्वे प्रवाशांना गणेशोत्सवाची भेट देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु या रेल्वे पॅसेंजर ऐवजी अनारक्षित एक्स्प्रेस म्हणून धावणार आहेत.
हुबळी-मिरज (क्र. 17332) ही रेल्वे 25 ऑगस्टपासून सकाळी 10.30 वा. हुबळी येथून निघणार आहे. उनकल, नवलूर, धारवाड, कऱयाकोप्प, मुगड, कांबरगणवी, अळणावर, तावरकट्टी, देवराई, लोंढा, गुंजी, खानापूर, देसूर येथून दुपारी 2.40 वा. बेळगावला पोहोचेल. यापुढे सांबरा, सुळेभावी, सुलदाळ, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द, शेडबाळ, विजयनगरमार्गे सायंकाळी 6.30 वा. मिरज येथे पोहोचेल. मिरज-हुबळी (क्र. 17331) ही एक्स्प्रेस 27 ऑगस्टपासून सकाळी 6.10 वा. मिरज येथून निघणार असून 9.45 वा. बेळगावला तर दुपारी 3 वा. हुबळी येथे पोहोचणार आहे.
मिरज-कॅसलरॉक (क्र. 17333) ही रेल्वे 26 ऑगस्टपासून सकाळी 10.15 वा. मिरज येथून निघणार असून विजयनगर, शेडबाळ, उगार खुर्द, कुडची, चिंचली, रायबाग, चिकोडी रोड, घटप्रभा, गोकाक रोड, पाच्छापूर, सुलदाळ, सुळेभावी, सांबरा मार्गे दुपारी 1.25 वा. बेळगावला तर देसूर, खानापूर, गुंजी, लोंढा, तिनईघाट मार्गे दुपारी 4.30 वा. कॅसलरॉक येथे पोहोचणार आहे. कॅसलरॉक-मिरज (क्र. 17334) ही रेल्वे सायंकाळी 5 वा. कॅसलरॉक येथून निघणार असून, 7.10 वा. बेळगावला तर रात्री 11.40 वा. मिरज येथे पोहोचणार आहे.
मिरज-लोंढा (क्र. 07351) ही रेल्वे गुरुवार दि. 25 रोजी सायंकाळी 7 वा. मिरज येथून निघणार असून रात्री 10.10 वा. बेळगाव येथे तर रात्री 11.55 वा. लोंढा येथे पोहोचणार आहे. लोंढा-मिरज (क्र. 07352) एक्स्प्रेस 26 रोजी पहाटे 5 वा. लोंढा येथून निघणार असून, सकाळी 6.10 वा. बेळगावला तर 9.45 वा. मिरज येथे पोहोचणार आहे.