मुंबई, कोलकाता आदी केंद्रांवर ही सेवा होणार उपलब्धल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सरकारच्या राष्ट्रीय चाचणी केंद्राने (एनटीएच) यांनी सांगितले आहे, की पुढील आर्थिक वर्षापासून त्यांच्या मुंबई आणि कोलकाता केंद्रांवर इलेक्ट्रिक वाहन बॅटरी आणि चार्जिंग सिस्टमसाठी चाचणी सेवा प्रदान करण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर एनटीएचने हे पाऊल उचलले आहे.
सध्या देशात दोन एजन्सी आहेत. मानेसर-आधारित इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी आणि पुणे-आधारित ऑटोमॅटिक रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या दोन्ही संस्थांकडून ईव्ही आणि त्यांच्या बॅटरीसाठी चाचणी सेवा उपलब्ध करण्यात येते.
भविष्यासाठी आमच्या प्रयोगशाळा
इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी वाढत आहे, त्यामुळे आम्ही आमच्या प्रयोगशाळा भविष्यासाठी तयार करत आहोत, अस ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव निधी खरे यांनी स्पष्ट केले आहे.