मुंबई
तिमाहीतील चांगल्या नफ्याच्या बातमीने ऑईल इंडियाचा समभाग 8 महिन्यांच्या उच्चांकावर पोहचला आहे. सदरच्या कंपनीच्या समभागाने शेअरबाजारात सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी 8 टक्के वाढत 242 रुपयांवर पोहचण्यात यश मिळवलं होतं. कंपनीने ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीत 1746 कोटी रुपयांचा सर्वाधिक असा नफा प्राप्त केला आहे. वर्षाआधी याच अवधीत हा नफा 1244 कोटी रुपयांचा होता.