वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक वाहन उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक भारतातील आपला व्यवसाय वाढविण्यासाठी जवळपास 300 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 24 अब्ज रुपयाच्या योजनेवर काम करत आहे. ओला ही रक्कम पश्चिम आशियाई आणि यूएसवर आधारित जागतिक खासगी इक्विटी फंडांमधून उभारण्याची तयारी करते आहे.
याचवेळी या व्यवहारांशी संबंधीत सुत्रांनी असा विश्वास व्यक्त केला आहे, की कंपनीच्या या निर्णयामुळे कंपनीच्या प्रवर्तकांची हिस्सेदारी ही सुमारे 37 ते 38 टक्के इतकी कमी होणार असून जी सध्या 40 टक्के इतकी असल्याची माहिती आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार कंपनीची गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्स कंपनीच्या निधीचे व्यवस्थापन करणार आहे. कंपनीचा सध्याचा वार्षिक महसूल सरासरी दर हा सुमारे 1 अब्ज डॉलर्स आहे. ओला इलेक्ट्रिकने त्याच वर्षी आपल्या ई स्कूटर्स ओला एस1 व ओला ए1 प्रोची डिलिव्हरी सुरु केली व मूल्य व महसूलही वधारला आहे.