सॅन फ्रान्सीस्को :
2027 पर्यंत ओएलईडी तंत्रज्ञानासह आपली उत्पादने बाजारात दाखल होणार असल्याची माहिती अॅपल या कंपनीने दिली आहे. अॅपल आपल्या 9 नव्या उत्पादनांमध्ये ओएलईडी डिस्प्ले तंत्रज्ञान सादर करणार आहे. ही नव्या तंत्रज्ञानाची उत्पादने 2027 पर्यंत बाजारामध्ये उपलब्ध होणार असल्याचेही म्हटले जात आहे. दुसरीकडे 2026 पर्यंत हे तंत्रज्ञान आयपॅड मिनी आणि आयपॅड एअर यामध्येही देण्याचा प्रयत्न असणार आहे.