कुटूंबातील १० जणांनी दिले अवयवदान पत्र; अवयवदान संकल्पाने विजयसिंह अण्णांना श्रध्दांजली
सरवडे प्रतिनिधी
येथील गोकुळ दूध संघाचे संचालक, बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. एका व्यक्तीने केलेल्या अवयव दानातून त्यांना हृदय उपलब्ध झाले होते. याची प्रेरणा घेऊन त्यांच्या उत्तर कार्याचे औचित्य साधून मोरे कुटुंबातील दहा व्यक्तींनी अवयव दानाचा संकल्प केला आहे. या संकल्पाने विजय अण्णांना श्रध्दांजली वाहिली असून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
यामुळे समाजातील गरजू व्यक्तींना त्यांचे उर्वरित आयुष्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी या अवयवांचा वापर होईल व जीवदान मिळेल. तर त्यांच्या कुटुंबाची हानी होणार नाही हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा संकल्प केला आहे.यामध्ये मोरे यांचे पुत्र रणधीर मोरे, विक्रमसिंह मोरे, स्नुषा संयोगिता मोर ,उत्कर्षा मोरे,पुतणे हर्षवर्धन मोरे, रोहित मोरे पुतणी ऋतुजा मोरे, निता पाटील, नातेवाईक राजश्री राणे यांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती अवयव दान संपत्ती पत्रानुसार त्यांनी हा संकल्प केला आहे.
या अवयवदानाचे संकल्प पत्र मोरे कुटुंबियामार्फत आरोग्य अधिकारी डॉक्टर माळवदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सदरच्या उपक्रमास सीपीआर रुग्णालय, कोल्हापूर चे जनसंपर्क अधिकारी बंटी सावंत,सुनिल दळवी, प्रा. अतुल कुंभार यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी बिद्री कारखानाचे अध्यक्ष के.पी.पाटील म्हणाले की, मोरे घराण्याने जपलेला सामाजिक कार्याचा वसा नवीन पिढीने ही पुढे चालू ठेवला आहे.अवयवदान हे एक उत्कृष्ट उदाहरण असून सर्वांनी यातून प्रेरणा घ्यावी.
यावेळी बिद्रीचे आजी -माजी संचालक, डी. एस.पाटील, एस.पी.पाटील, दामोदर वागवेकर,सुनिल पिराले,राजेंद्र पाटील,आर. टी. पाटील,राजेश मोरे, शिवाजी आदमापुरे,जयवंत पाडळकर,शंकरराव कोपार्डेकर, कुंडलराज पाटील,बंधू डी. के. मोरे, आर.के.मोरे, जे.के.मोरे,माजी ग्रा. पं. सदस्य दिग्विजयसिंह मोरे यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.