प्रतिनिधी / खानापूर : तालुक्यातील नागरगाळी वनक्षेत्रातील हलगा येथील जंगलात रानडुकराची शिकार करून ते मास विक्री करण्यासाठी नेत असल्याची माहिती नागरगाळी वनाधिकाऱ्यांना मिळाली होती. वनखात्याच्या कर्मचार्यांनी सापळा रचून ज्ञानेश्वर हलगेकर राहणार हलशी याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 15 किलो रानडुकराचे मास तसेच ताकडी, कुर्हाड, कोयता जप्त करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर हलगेकर याच्यायावर वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला खानापूर न्यायालयात हजर केले असता हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली या वेळी नागरगाळी वनक्षेत्राचे उपवन अधिकारी एन जी हिरेमठ विजयकुमार कौजलगी, मंहतेश लचांडी, विष्णू वीर यांनी कारवाई केली.