प्रयाग चिखली वार्ताहर
प्रयाग चिखली येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली सापडून पाडळी बुद्रुक (ता. करवीर) येथील जावई येथील बंडेराव भीमराव जाधव-भोई (वय ५२) मुळगाव- वाघापूर ता. भुदरगड हे मोटरसायकलस्वार जागीच ठार झाले. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चिखली (या करवीर) येथील प्रयाग रोड वर हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी.
आसुर्ले येथील दत्त दालमिया कडे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ऊस भरून सकाळी नऊच्या सुमारास प्रयाग रोड वरून जात होता. यावेळी महापालिका शिक्षण विभागाकडे नोकरीस असणारे पाडळी बुद्रुक येथील पांडुरंग नलवडे यांचे जावई बंडेराव भीमराव जाधव हे आपल्या मोटरसायकल वरून कोल्हापूरकडे जात होते यावेळी त्यांच्या गाडीला अपघात होऊन ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली पडले यावेळी ट्रॅक्टर त्यांच्या अंगावरून गेल्याने जाधव हे जागीच ठार झाले.
मयत जाधव यांचे मूळ गाव वाघापूर तालुका भुदरगड असून ते सध्या त्यांचे सासरे पांडुरंग नलवडे यांच्या घरी सुमारे पंधरा-वीस वर्षापासून कुटुंबासह राहत होते त्यांचे मूळ गाव वाघापूर (ता.भुदरगड) हे आहे त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. अपघातातील ट्रॅक्टर हा बीड येथील असून आज सकाळी पाडळी बुद्रुक येथून ऊस भरून दालमिया आसुर्ले कारखान्याकडे जात असताना हा अपघात घडला. घटनास्थळी करवीर पोलिसांनी पंचनामा केला