नवारस्ता / प्रतिनिधी :
पाटण तालुका बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी पक्षाची एकहाती सत्ता असणाऱ्या माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या 40 वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावून 18 पैकी 15 जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी सह महाविकास आघाडीचा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले दरम्यान दरम्यान राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.