सातार्डा /वार्ताहर –
सातार्डा येथील महात्मा गांधी विद्या मंदिर हायस्कुलचा दहावीचा निकाल शंभर टक्के एवढा लागला आहे. या हायस्कूलमधून कु तन्वी रामचंद्र घाडी हिने 84. 40 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावीला आहे. कु स्वरूपा संदेश सुतार 83. 80 टक्के गुण मिळवून द्वितीय व कु सुमन चक्रधर मांजरेकर 83. 60 टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. उत्तीर्ण सर्व विद्यार्ध्याचे सातर्डे मध्यवर्ती संघ, मुंबई, शालेय समिती,मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी तसेच पालकवर्गातून अभिनंदन केले जात आहे.