वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने शुक्रवारी रात्री दोन प्रवाशांकडून एक किलो सोने जप्त केले. एअर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकहून परतणाऱ्या महिलेकडून 449 ग्रॅम सोने जप्त केले. या सोन्याची किंमत 26 लाख रुपये आहे. तर अन्य एका प्रवाशाकडून 542 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. तो अबुधाबीहून परतला होता. या सोन्याची किंमत 29 लाख रुपये आहे. दोन्ही प्रवाशांकडील मौल्यवान साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांची अधिक चौकशी सुरू आहे.