किंमत 35 हजाराच्या घरात राहण्याची शक्यता : 50 एमपीचा कॅमेरा
वृत्तसंस्था/ बिजिंग
चीनी कंपनी वन प्लसने आपला एस (Aम)टू प्रो हा स्मार्टफोन चीनमध्ये नुकताच लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये कॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8जन 2 ही चिप असणार असून 150 वॅटचा फास्ट चार्जर दिला जाणार आहे. एस टू प्रो ची किंमत अंदाजे 34 हजार 600 रुपये इतकी असणार असल्याची माहिती आहे. 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येणारा हा स्मार्टफोन 6.74 इंचाच्या अमोलेड डिस्प्लेसह येईल.
5000 एमएएचची बॅटरी यात असणार असून फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी 50 मेगापिक्सलचा दमदार कॅमेराही दिला जाणार आहे. फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे 24 जीबी रॅम व 1 टीबी स्टोरेजच्या पर्यायाचा फोनही कंपनीने दाखल केला आहे. चीनमध्ये हा फोन 23 ऑगस्टपासून विक्रीकरता उपलब्ध होणार आहे. भारतामध्ये या फोनच्या लॉन्चिगसंदर्भात कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
शाओमीचा 13 टी, 13 टी प्रो 1 सप्टेंबरला लाँच
दुसरीकडे चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी आपला 13 टी, 13 टी प्रो हे दोन स्मार्टफोन पुढील महिन्यात 1 तारखेला जागतिक स्तरावर लाँच करण्याची योजना आखत असल्याचे समजते. 13 टी हा 8 जीबीरॅम व 2546 जीबी स्टोरेजसह येणार असून 59 हजार रुपयांच्या घरात याची किंमत असणार आहे तर दुसरीकडे 13 टी प्रोची किंमत ही 75 हजार रुपयांच्या घरात असेल. यावरील स्टोरेजच्या स्मार्टफोनसाठी ग्राहकांना 91 हजार रुपये मोजावे लागणार आहेत.