अध्यक्ष विश्वास पाटील यांची माहिती; महिन्यात दूसऱ्यांदा दरवाढ
कोल्हापूर प्रतिनिधी
गोकुळ दूध संघाकडून गाय दूध खरेदी दरात एक रुपयांची वाढ केल्याची माहिती अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. गुरुवार 8 रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. रविवार 11 रोजीपासून हि दरवाढ लागू होणार आहे. गोकुळने महिन्यात दूसऱयांदा गाय दूध खरेदी दरात वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे.
सुधारीत दरानुसार 3.5 फॅट आणि 8.5 एस.एन.एफ प्रतीच्या दूधास प्रतिलिटर 32 रुपये दर मिळणार आहे. भविष्यातही गोकुळशी सलग्न दूध उत्पादकांचे हित जोपासण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. सुधारीत दरपत्रक गोकुळकडून दूध संस्थांना पाठविण्यात आले आहे. मागील वर्षभरात गोकुळने म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर 6 रुपयांची वाढ दूध उत्पादकांना दिली आहे. त्यामुळे दूध उत्पादकांमधून समाधान व्यक्त होत आहे.