आगामी काळातील कंपनी ध्येय-धोरण निश्चित करण्यावर भर देणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वोच्च तेल आणि वायू उत्पादक कंपनी ओएनजीसी लिमिटेड 2030 पर्यंत हरित ऊर्जा उद्दिष्टामध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच दशकाच्या अखेरीस नवीकरणीय स्त्राsतांपासून वीज निर्मिती करण्याचे ध्येय असून सध्याच्या 189 मेगावॅटवरून एक गिगावॅटपर्यंत वाढवण्याची योजना राहणार आहे.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ओएनजीसीचे अध्यक्ष अरुण कुमार सिंग यांनी सोमवारी सांगितले की, कंपनीने राजस्थानमध्ये पाच गिगावॅटचा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकारशी करार केला आहे. ते म्हणाले की, कंपनी आता किमान पाच गिगावॅटचे आणखी प्रकल्प उभारण्यासाठी संधी शोधत आहे. या संदर्भात कंपनी ऑफशोअर पवन प्रकल्पांवरही लक्ष केंद्रित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मंगळुरूमध्ये ग्रीन अमोनिया प्रकल्पाचा विचार
सिंग म्हणाले की, एकूण एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. कंपनीने 2022-23 मध्ये तेल आणि वायू उत्पादनात झालेली घट मागे टाकली आहे आणि आता पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या प्रकल्पांमधून उत्पादन वाढविण्याचा विचार करत आहे.