नवी दिल्ली
: केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग व्यवसायावर 28 टक्के जीएसटी लागू केला आहे पण ऑनलाईन गेमिंग कंपन्या मात्र सरकारला कर भरत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या संदर्भात 55,000 कोटी रुपये भरण्यासंबंधी विविध कंपन्यांना कर विभागाने नोटीस पाठवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
याअंतर्गत ड्रीम 11 कंपनीला 25000 कोटी रुपये भरण्यासंबंधी कर विभागाने नोटीस पाठविली आहे. यासह अन्य ऑनलाईन गेमिंग कंपन्यांना जवळपास 30000 कोटी रुपये भरण्यासंबंधी नोटीस जारी केली असल्याचे सांगितले जात आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन गेमिंगची सुविधा देणाऱ्या कंपन्यांवरची कर भरण्याची रक्कम 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होऊ शकते. सरकारने ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लागू केला आहे.