ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाविकास आघाडीचं लक्ष्य सध्या लोकसभेकडे आहे. पण वरिष्ठ नेत्यांनी लोकसभेत जावं असा कोणताही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी सध्या अंदाज घेत आहे. जे लोक लोकसभा निवडणुकीत चांगलं काम करतील, अशा लोकांचा विधानसभेच्या तिकीटासाठी विचार होईल, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भंडाऱ्यात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत. त्याबद्दल अजित पवार म्हणाले, भावी मुख्यमंत्र्यांचे बॅनर लागले म्हणून कोणाला त्रास व्हायचं कारण नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो म्हणून ते बॅनर लावतात. मात्र, मुख्यमंत्री असंच होता येत नाही. त्यासाठी पक्षाकडे 145 चा आकडा लागतो.