वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओप्पो कंपनीने आपला नवा ए-38 हा स्मार्टफोन भारतात नुकताच लाँच केला आहे. सदरचा फोन परवडणाऱ्या किमतीत सादर केला आहे. दोन कॅमेरा सेन्सर व एक एलईडी फ्लॅश याला असून 4 जी एलटीई कनेक्टीव्हीटीची सोय यात आहे. 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह असणाऱ्या फोनची किमत 12 हजार 999 रुपये इतकी असणार आहे. फोनची विक्री फ्लिपकार्टवर होणार असून फोन ग्लोइंग गोल्ड व ग्लोइंग ब्लॅक या रंगात सादर करण्यात आलाय. 6.56 इंचाचा एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले याला असून स्टोरेजमध्ये वाढ करायची असेल तर मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल. 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा व 2 एमपीचा पोट्रेट कॅमेरा फोनमध्ये आहे. बॅटरी 5 हजार एमएएच क्षमतेची देण्यात आली असून 33 वॅटचा फास्ट चार्जरही सोबत दिला आहे.
गुगल पिक्सल 8, पिक्सल 8 प्रो लाँच तारीख जाहीर
गुगलने आपले पिक्सल 8 आणि पिक्सल 8 प्रो हे नवे स्मार्टफोन भारतीय बाजारात 4 ऑक्टोबरला उतरवण्याचे निश्चित केले असल्याची माहिती आहे. स्मार्टफोन विक्रीसाठी कंपनीने इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टसोबत करार केला असल्याचे समजते. नव्या फोनसंदर्भात झलक अलीकडेच गुगलने सादर केली आहे. टेन्सर जी 3 ही चिप यामध्ये असून ड्युअल कॅमेराही असेल. सदरच्या फोनची आयफोन 15 प्रो सोबत स्पर्धा असणार असून एआय अर्थात आर्टिफिशीयल इंटेलिजन्सचा वापर यावर करता येणार आहे.