वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिनी टेक कंपनी ओप्पो यांनी ओप्पो ए 79 5जी स्मार्टफोन लॉन्च केला आहे. सदरचा स्मार्टफोन 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह सादर केल्याची माहिती आहे. सदरच्या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयेपर्यंत असणार असून 6.72 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले यामध्ये असणार आहे. ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सहित इतर ठिकाणी हा स्मार्टफोन शनिवार 28 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.
ओप्पो ए 79 5जीची वैशिष्ट्यो
उत्तम कार्यप्रणालीसाठी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमनसिटी 6020 प्रोसेसर दिला गेला आहे. अँड्रॉइड 13 वर आधारित कलर ओएस 13.1 ऑपरेटिंग सिस्टीम वर हा स्मार्टफोन चालणार असून फोटोग्राफीचा विचार करता यात ड्युअल कॅमेराची सोय करण्यात आली आहे. प्रायमरी कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा असणार असून सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगकरिता 8मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. 33 वॉटचा त्वरेने चार्ज होणारा चार्जर यासोबत मिळणार असून 5 हजार एमएएच क्षमतेची बॅटरीदेखील यात असणार आहे. तीस मिनिटांच्या कालावधीमध्ये बॅटरी 51 टक्के इतकी चार्ज होत असल्याचा दावा कंपनी करते आहे. 5जी, 4जी, 3जी, वाय फाय, ब्लूटूथ, जीपीएस कनेक्टिव्हिटी या फोनमध्ये असणार आहे.
….यांना मिळणार सवलत
चार्जिंगसाठी यूएसबी टाइप सी दिले गेले असून अधिकृत संकेतस्थळावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही बँकांच्या क्रेडिट कार्डवर सवलतीत स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. सहा महिन्याच्या नो कॉस्ट इएमआय अंतर्गत हा स्मार्टफोन निवडक बँक कार्डधारकांना खरेदी करता येणार असून 2 हजार रुपयांची सवलत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.