बेळगाव : ” केवळ राजकारणासाठी माझ्या राजकीय विरोधकांना माझ्याबद्दल आक्षेप शोधावे लागतात आणि विकासाच्या बाबतीत आक्षेप घेण्याची संधी उरलेली नाही. याचे सर्व श्रेय जनतेला जाते,” असे मत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कांग्राळी केएच गावातील सिद्धेश्वरनगर आणि रझाक कॉलनी येथील काँक्रीट रस्ता व नाली बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर त्या बोलत होत्या.
“मी या क्षेत्रात जात, धर्म आणि राजकारण बाजूला ठेवून केवळ विकासाचे ध्येय समोर ठेवून काम केले आहे. कुठेही भेदभाव होऊ दिलेला नाही. सामान्य लोकांमध्ये एक सामान्य माणूस म्हणून विकासात सहभागी झाले. घाणेरडे राजकारण करण्याऐवजी लोकांमध्ये मिसळून काम केलं त्यामुळे जनता आज मला साथ देत आहे त्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन. तसेच अशीच साथ या निवडणुकीतही द्या, असे आवाहन त्यांनी केलं.
यावेळी स्थानिक रहिवासी खताळ दावणगेरी, अब्दुल रझाक, सलीम पीरजादे, कलीम जमादारा, युनूस काकती आदी उपस्थित होते.