2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी पाटणा येथे भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरु बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. ज्या बैठकिमध्ये बिगर- भाजप पक्ष, प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पक्ष भाग घेत आहेत. पाटणा येथील ‘नेक संवाद सुरक्षा’ अतिथीगृहात विरोधी पक्षनेत्यांची बैठक सुरू आहे.
या बैठकिसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे निमंत्रक अरविंद केजरीवाल हे हि या बैठकिला हजर झाले आहेत. तसेच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही उल्लेखनीय उपस्थिती या बैठकीला लाभली.
तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्र के.चंद्रशेखर राव आणि बसपा प्रमुख मायावती हे या बैठकी पासून दुर राहीले. पटनायक आणि केसीआर यांनी आमंत्रणानंतरही गैरहजेरी लावली तर तर मायावतींना बैठकीसाठी आमंत्रित केले गेले नाही. जेडीयूचे मुख्य प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी जे पक्ष 2024 मध्ये भाजपविरोधात लढण्यास इच्छुक आहेत त्यांनाच आम्ही आमंत्रित केले असल्याचे म्हटले आहे.