Organized District Level Storytelling Competition at Malgaon Khanolkar Vachan Mandir
कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर मळगाव व कै. प्राचार्य रमेश कासकर मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्रा. रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन शनिवारी २१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात करण्यात आलेले आहे.
स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी असून इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी या गटासाठी संस्कार कथा हा विषय असून वेळ चार ते पाच मिनिटे अशी आहे. या गटामधून प्रथम ७५१ व्दितीय ५५१ तृतीय ३५१ उत्तेजनार्थ २ पारितोषिके प्रत्येकी १०१ याप्रमाणे आहेत. प्रमाणापत्र व ग्रंथ भेट देण्यात येणार आहे.
इयत्ता आठवी ते इयत्ता दहावीच्या गटात शौर्य कथा हा विषय असून वेळ फाच ते सहा मिनिटे अशी आहे. या गटामधून प्रथम ७५१ व्दितीय ५५१ तृतीय ३५१ उत्तेजनार्थ २ पारितोषिके प्रत्येकी २०१ तसेच प्रमाणपत्र व पुस्तक देण्यात येणार आहे. एका शाळेतून जास्तीत जास्त दोन स्पर्धकांना एका गटातून भाग घेता येईल सदर स्पर्धेत भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संबंधित शाळांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन वाचन मंदिराने केले आहे.
न्हावेली / वार्ताहर