सायना नेहवाल, पी.कश्यप, साईप्रणीत भारताचे प्रमुख आव्हानावीर
वृत्तसंस्था/ पॅरिस
मंगळवारपासून येथे सुरू होणाऱ्या अर्लीन्स मास्टर्स 2023 बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल, पाऊपल्ली कश्यप व बी. साईप्रणीत भारताचे प्रमुख आव्हानवीर असतील. 9 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा होणार आहे.
या बीडब्ल्यूएफ सुपर 300 स्पर्धेत भारताचे प्रमुख खेळाडू पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय सहभागी होणार नाहीत, असे ऑलिम्पिक डॉट कॉमने सांगितले आहे. सिंधू रविवारी झालेल्या माद्रिद मास्टर्सच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्याने तिला उपविज्sातेपदावर समाधान मानावे लागले. जर्मन ओपन, ऑल इंग्लंड बॅडमिंटन ओपन, स्विस ओपन व माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत सहभागी न झालेली सायना नेहवाल येथील स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल. या वर्षी झालेल्या इंडियन ओपन स्पर्धेत तिने शेवटचा सहभाग घेतला होता. माजी अग्रमानांकित असलेली सायना सध्या जागतिक क्रमवारीत 31 व्या स्थानावर असून तिची पहिल्या फेरीची लढत पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूशी होईल. ही लढत जिंकल्यास तिची दुसऱ्या फेरीत ऑलिम्पिक चॅम्पियन पॅरोलिना मारिनशी होण्याची शक्यता आहे.
दुखापतीमुळे या वर्षी अनेक स्पर्धांत खेळू न शकलेला पी. कश्यप पुऊष एकेरीत पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी पात्रता टप्प्यात पुनरागमन करीत आहे. 1 मे 23 पासून ऑलिम्पिक पात्रतेचा टप्पा सुरू होणार असून तो 28 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे. कश्यप सध्या जागतिक क्रमवारीत 97 व्या स्थानावर असून त्याची सलामीची लढत चीनच्या चि यु जेनशी होणार आहे. गेल्या वर्षी कश्यपने जेनवर विजय मिळविला असल्याने या लढतीत त्याची बाजू वरचढ ठरणार आहे.
महिला एकेरीत मालविका बनसोड, आकर्षी कश्यप सहभागी झाल्या असून पुऊष एकेरीत समीर वर्मा, मिथुन मंजुनाथही सहभागी झाले आहेत. बी. साई प्रणीतची सलामीची लढत पात्रता फेरीतून आलेल्या खेळाडूशी होईल. मागील महिन्यात स्विस ओपनमध्ये पुऊष दुहेरीचे जेतेपद पटकावलेल्या चिराग शेट्टी-सात्विकसाईराज रनकिरे•ाr यांना येथे अग्रमानांकन देण्यात आले आहे. जागतिक क्रमवारीत ते सध्या सहाव्या स्थानावर आहेत. त्यांची सलामीची लढत हॉलंडच्या ऊबेन जिले व टाइस व्हान डर लेक यांच्याशी होणार आहे.