अभिनेत्री रसिका दुग्गलची प्रतिक्रिया
दिल्ली क्राइम अन् मिर्झापूर यासारख्या सीरिजमध्ये काम केलेली अभिनेत्री रसिका दुग्गलने ओटीटी प्लॅटफॉर्मवर महिलांना मोठी संधी मिळत असल्याने आनंद व्यक्त केला आहे. पूर्वी तयार होणारे महिलाकेंद्रीत चित्रपट हे केवळ नावापुरती असायचे, ते फार चालायचे नाहीत.परंतु आता पटकथांमध्ये महिलांना पुरेसा वाव मिळेल अशाप्रकारच्या भूमिका मिळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महिलांबद्दल ज्याप्रकारच्या कथा लिहिल्या जात आहेत, ते पाहता मी आनंदी आहे. काही वर्षांपूर्वी लोक महिलाकेंद्रीत चित्रपटांबद्दल केवळ बोलत आहेत असे वाटत होते. परंतु आता महिला कलाकाराच्या अभिनयाला वाव मिळेल अशाप्रकारचे चित्रपट अन् सीरिज तयार केल्या जात आहेत. दिल्ली क्राइम याचे एक अत्यंत उत्तम उदाहरण असल्याचे रसिका यांनी म्हटले आहे.
रसिका दुग्गल अलिकडेच प्रदर्शित वेबसीरिज ‘दिल्ली क्राइम’च्या दुसऱया सीझनमध्ये झळकली आहे. याचबरोबर ती ‘मिर्झापूर’च्या तिसऱया सीझनमध्येही दिसून येणार आहे. अभिनेत्रीने स्वतःच्या कारकीर्दीची सुरुवात 2007 मध्ये ‘अनवर’ या चित्रपटाद्वारे केली होती.