ओटवणे प्रतिनिधी
ओटवणे येथील श्री रवळनाथ विद्यामंदिरचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९६.५५ टक्के लागला. या परीक्षेला बसलेल्या २९ पैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या शाळेतून प्रथम क्रमांक करिश्मा मिलिंद राणे ९३ % (५०० पैकी ४६५ गुण), द्वितीय क्रमांक रेश्मा चंद्रकांत नाईक ९१.२० % (५०० पैकी ४५६ गुण), तृतीय क्रमांक सानिका विश्वनाथ भिसे ८८.४० % (५०० पैकी ४४२ गुण) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर या प्रशालेतील विशेष श्रेणीत १२ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ११ विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत ४ विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत १ विद्यार्थी आला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष वामन कविटकर, सचिव राजाराम वर्णेकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.