प्रतिनिधी /म्हापसा
राज्यात पंचायतीच्या निवडणुका संपल्या असून राज्यात शिवोलीतून चांगले उमेदवार निवडून काढले असून उद्या निकाल असून संपूर्ण शिवोली मतदारसंघातून आपले उमेदवार मोठय़ा मतदानाच्या फरकाने निवडून येणार असल्याची माहिती शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी काणका येथे निवडणूक संपल्यावर पत्रकारांशी बोलताना दिली.
या सर्वांचे श्रेय प्रत्येक उमेदवारास तसेच मावळत्या पंचाच जाते. सर्वांनी या पंचायत निवडणुकीसाठी अहोरात्र काम केलेले आहे. वॉर्ड सदस्य म्हणजे वाडय़ाचाच नाही तर तो गावचा आहे. वाईट प्रसंगी त्याने सर्वांच्या मदतीस कोणत्याही क्षणी उपलब्ध असायला पाहिजे. त्याच्या दुःखात सुखात भाग घेतात त्यामुळे शिवोली व कळंगूट असे पॅनल निवडून आणणार अशी आपल्यास पुरी खात्री आहे असे डिलायला लोबो म्हणाल्या.