ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अमान अन्सारी (वय 22) असे या पाकिस्तानी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्सारी हा पाकिस्तानी तरुण 2015 पासून पुण्याच्या भवानी पेठेत राहत असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खडक पोलिसांनी भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून अन्सारी याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे भारतीय पारपत्र आढळून आले. बनावट कागपत्रांच्या आधारे त्याने हे भारतीय पारपत्र मिळवले आहे. देशात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.
अधिक वाचा : राज्यात पुन्हा गारपिटीचा इशारा
अन्सारीचा देशात बेकायदा वास्तव्य करण्यामागचा हेतू काय होता, तसेच तो कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे का, याचा तपास आता खडक पोलिसांकडून सुरू आहे.