द्विपक्षीय संबंध सुधारण्याचा प्रयत्न करणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
2019 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे अमेरिकेच्या दौऱयावर आहेत. देशात सुरू असलेली राजकीय उलथापालथ आणि त्यापूर्वी पूरामुळे स्थिती बिकट झाली आहे. पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठय़ावर आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध अत्यंत बिघडले होते. जनरल बाजवा हे अमेरिकेसोबतच्या संबंधांमध्ये नवी ऊर्जा आणू पाहत असल्याचे उद्गार पाकिस्तानचे राजदूत सरदार मसूद खान यांनी काढले आहेत. बाजवा हे शुक्रवारी लंडनमधून न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत.