कोडोली येथे फिरते लोकन्यायालय
वारणानगर / प्रतिनिधी
कायदा सर्वांपर्यंत पोहचवण्यास लोक अदालत महत्वाचे माध्यम ठरत असून समाज कायद्याने संज्ञान होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पन्हाळा न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश के. जी. खोमणे यानी केले.
कोडोली ता. पन्हाळा येथे फिरते लोक आदालत केंद्र, ग्रामपंचायत कोडोली, महात्मा गांधी तंटामुक्त समिती यांच्या संयुक्त समारंभात न्यायाधिश खोमणे बोलत होत्या. त्यांचा समारंभाच्या अध्यक्ष सरपंच भारती पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. न्यायालयात दाखल होण्यापूर्वीच्या तक्रारीवर दोन्ही पक्षकारांना मार्गदर्शन करीत तक्रारीचे निवारण लोक आदालत केंद्रात केले.
सर्व भाषात कायद्याची पुस्तके उपलब्द आहेत बोली भाषात कायद्याची न्याय प्रक्रिया पार पडली जाते. कायद्याच्या छोट्या छोट्या पुस्तकांच्या माध्यमातून लोकांना माहिती व्हावी यासाठी सदरची पुस्तके भेट दिली पाहिजेत. प्रत्येकाने आपल्यावर प्रसंगानुरूप दाखल करण्यात आलेला गुन्हा त्याला लावलेली कलमे आपण न्यायालयात मांडणारी बाजू याचा अभ्यास केला पाहिजे. शालेय स्तरावर ‘पोक्सो कायदा, सार्वजनिक नुकसान, दंगा, खूनासारख्या घटना यांचेवर न्यायालयीन स्तरावर काम चालवत होणारी न्याय प्रक्रिया याचे सविस्तर विश्लेषण न्यायाधिश खोमणे यानी याप्रसंगी केले.
कोडोली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण यानी स्वागत केले.पन्हाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. रविंद्र तोरसे,अँड. विश्वास पाटील, कोडोली पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड,उपसरपंच प्रविण जाधव, सदस्य मोहन पाटील,प्रकाश पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय बजागे,सदस्य उदयसिंह पाटील,अशोक भोसले, डॉनियल गायकवाड, संभाजी कदम, सलीम आंबी, मारुती इंदुलकर, अशोक पाटील, उदय पाटील,डी.एन. यादव,गीता केकरे उपस्थित होते अँड.नंदकुमार खामकर यानी आभार मानले.