वारणानगर / प्रतिनिधी
ऐतिहासिक पन्हाळगडावर जाणारा बाघबीळ- पन्हाळा मार्ग आणि वाठार,कोडोली – बोरपाडळे या राज्यमार्गावर रस्त्याला लागून असलेल्या बांधकाम विभागाच्या जागा त्यांच्याच दुर्लक्षामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या आहेत.
कोडोली राज्य मार्गावर तसेच पन्हाळा मार्गावर रस्त्याकडेला लागूनच असलेल्या बांधकाम विभागाच्या जागेत अनेकांनी व्यवसाय सुरु केला आहे तर काहीनी पक्या इमारती बांधून व्यवसाय सुरू केला आहे या जागातील अतिक्रमण होण्यास बांधकाम विभागाचे अधिकारी. कर्मचारी जबाबदार असून त्यांच्या वरदहस्ताने व दुर्लक्षामुळे अतिक्रमन धारकांना बळ मिळाले आहे.
प्रमुख व राज्य मार्गावर रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला ५० मिटरने राज्य मागाची नियत्रंण रेषा आहे. या नियंत्रण रेषांच्या हद्दी निश्चित करून बांधकाम विभागाने आपली जागा संरक्षित करण्याची गरज आहे .या नियंत्रण रेषेच्या आत कोणालाही बांधकाम करता येत नाही सर्रास रस्त्याला लागून असलेल्या जागा मालकानी स्वत्ताची हद्द रस्त्याला लागून आहे हे गृहीत धरून या जागा भाडे करारावर दिल्या आहेत बांधकाम विभागाच्या कक्षेत असलेल्या खुल्या जागेवर देखील अनेकजन भाड्याची वसूली करू लागले आहेत.
वाघबीळ – पन्हाळा मार्गावर रस्त्याला लागूनच दानेवाडी हद्दीतील गट क्रमांक २०० ब /२ पैकी २००० चौ.मि. या जागेवर विना परवाना इमारत बांधून हॉटेल सुरु केले आहे. बांधकाम विभागाने तसेच महसूलच्या प्रांताधिकारी तहसिलदार यांनी जागा मालक प्रताप पाटील यांना बांधकाम स्वत्ता काढून घ्यावे अन्यथा पाडण्यात येईल असा नोटीसीद्वारे इशारा देवून मुदत संपली तरी आजवर हे बांधकाम काढलेले नाही. याबाबत सुहास पाटील माले यानी तक्रार दाखल केली आहे.
बांधकाम विभागाने रस्त्याकडेला ५० मिटर पर्यन्तच्या हद्दी निश्चित नाहीत तक्रार दाखल झाल्यावर महसूल विभागाचा प्रांताधिकारी ते गाव कामगार तलाठी यांची स्थळ पाहणी व कारवाई यांच्या येणाऱ्या आवाहल व कृती यात वेळ जात असल्याने अतिक्रमण धारकांना बळ मिळू लागले आहे.