वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज ऋषभ पंतला शुक्रवारी दिल्ली-डेहराडून महामार्गावर वाहन दुर्घटनेत गंभीर दुखापत झाली आहे. या दुखापतीवर वैद्यकीय इलाज सुरू असून त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्याला डेहराडूनला हलविण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे. दुखापतग्रस्त ऋषभ पंतला ऑस्ट्रेलियाबरोबरची ही कसोटी मालिका तसेच 2023 ची आयपीएल स्पर्धा हुकण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
कार दुर्घटनेत ऋषभ पंतला गंभीर दुखापती झाल्या असून त्याला या सर्व समस्येतून पूर्ण बरे होण्यासाठी किमान 3 ते 6 महिन्यांचा कालावधी जरुरीचा आहे, अशी माहिती क्रीडा विभागातील प्रमुख डॉ. कम्मार आझम यांनी दिली आहे. ऋषभ पंतला या दुखापतीने जायबंदी केले असून तो किमान सहा महिने क्रिकेटपासून अलिप्त राहील. या समस्येमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व ऋषभ पंतकडे सोपविण्यात आले होते. अलीकडेच बांगलादेशच्या दौऱयात भारताने कसोटी मालिकेत 2-0 असा एकतर्फी विजय मिळविला असून या संघामध्ये पंतचा समावेश होता.