प्रतिनिधी /बेळगाव
समर्थनगर मेन रोड येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायीक सामुदायीक पारायण सोहळय़ाची सोमवारी सांगता झाली. यानिमित्त सोमवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो नागरिकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
सोमवारी सकाळी रामण्णा शिवण्णावर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सकाळी 9 ते 11 या वेळेत कोगनोळी येथील गुरुवर्य पूर्णानंद काजवे महाराज यांचे कालाकिर्तन झाले. पूर्णानंद महाराजांनी भक्ती व अध्यात्माविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सतत तीन दिवस हरीपाठ, प्रवचन, किर्तन, व भजन असा अखंड कार्यक्रम सुरू होता. बेळगाव तालुक्मयाबरोबरच आजुबाजुच्या वारकऱयांनी या पारायण सोहळय़ात सहभाग घेतला होता.
यावषी पहिल्यांदाच हा पारायण सोहळा पार पडला. बेळगाव परिसरातील भाविकांनी या सोहळय़ाला भरभरून प्रतिसाद दिला. सोमवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी परिसरातील युवक मंडळ, महिला मंडळ व नागरिकांनी मेहनत घेतली.