सामनावीर मोहम्मद अब्बास, मालिकावीर स्वयंम खोत
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित पेरेंट्स चषक 11 वर्षाखालील मुलांच्या अंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युनियन जिमखाना संघाने लायाज क्रिकेट अकादमी संघाचा 3 गड्याने पराभव करुन पेरेंट्स चषक पटकावला. सामनावीर मोहम्मद अब्बास, मालिकावीर स्वयंम खोत यांना गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यात लायाज क्रिकेट अकॅडमी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 9 गडी बाद 101 धावा केल्या. त्यात खंडू पाटीलने 28 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे सुहास हिरेकोडी, मोहम्मद अब्बास, मोहम्मद हमजा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 22 षटकात 7 बाद 102 धावा करुन सामना 3 गड्यानी जिंकला. त्यात मोहम्मद अब्बासने 37 धावा केल्या. लायाज अकादमीतर्फे स्वयंम खोतने 5 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर, रोहित पोरवाल, चंदन कुंदरनाड, ताहीर सराफ यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर मोहम्मद अब्बास, उत्कृष्ट फलंदाज मोहम्मद हमजा, उत्कृष्ट गोलंदाज सुहास हिरेकोडी, उगवता क्रिकेटपटू फरहान शेख व स्मितराज पोरवाल, इम्पॅक्ट खेळाडू विवान भूसद, मालिकावीर स्वयंम खोत यांनी वैयक्तिक बक्षीसे पटकावली.