वाळपई येथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गौरव
प्रतिनिधी /वाळपई
प्रत्येक पालकाने आपल्या मुलावर चांगल्या प्रकारचे संस्कार करताना चांगल्या प्रकारचे शिक्षण त्यांना उपलब्ध व्हावे यासाठी विशेष खबरदारी घ्यावी. येणाऱया काळात आपल्या पाल्यांना समाजामध्ये निर्माण होणाऱया स्पर्धेला सक्षमपणे उभे करायचे असेल तर चांगल्या शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे प्रतिपादन डॉ. अशोक आमशेकर यांनी केले आहे.
वाळपई येथील सावईकर कोचिंग क्लासेस यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या मुलांच्या शैक्षणिक गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सावईकर कोचिंग क्लासेस परेश सावईकर यांची उपस्थिती होती. वाळपई मणेरकर सभागृहात आयोजित या हृद्य सोहळय़ाला मोठय़ा संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सुजामी पोकळे (2019-20, 94.5 टक्के प्रथम) चिन्मय गाडगीळ (2020-21, 96.17 टक्के, प्रथम) व वेद मराठे (2021-22, 98 टक्के, प्रथम) यांना अनंत विश्वनाथ सावईकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रत्येकी रोख रुपये पाच हजार एक व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
वेदा बापट (2020-21, 96 टक्के, द्वितीय) हिलाही विशेष चषक देऊन गौरविण्यात आले. 2021-22 तुकडीतील गौरविण्यात आलेले अन्य विद्यार्थी पुढीलप्रमाणे ऋचा बर्वे (95.7 टक्के), व्यंकटेश जोशी (95.2 टक्के), मृणाल बागी (94 टक्के), हर्ष बर्वे (92.66 टक्के), वरुण राणे (91.66 टक्के), शर्मद नार्वेकर मिताली नाईक, श्रीजा हळदणकर, नि÷ा दळवी, मेघा देसाई, विधी तेली, प्रथमेश पवार, सानिका कृष्णा गावस, वलांसिया डायस तसेच या क्लासेसचा माजी विद्यार्थी क्लिंटन नोरोन्हा याल नीट परीक्षेत 518 गुण मिळविल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. क्लिंटन नोरॉन्हा, मेघा देसाई, सानिका गावस, वेद मराठे या विद्यार्थ्यांनी सावईकर क्लासेस संबंधी आपले अनुभव कथन केले. शिक्षिका वेदा जोशी यांनी आभार मानले.