वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या एका विमानात काही प्रवाशांनी परस्परांनी जोरदार मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक शर्ट न परिधान केलेला प्रवासी दुसऱया प्रवाशाशी लढताना दिसून येतो. मागील काही काळात अनेक देशांमध्ये विमानात प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या घटना दिसून येत आहेत. बांगलादेशच्या नॅशनल एअरलाइन ‘बिमान’च्या फ्लाइट बोइंग 777 मध्ये मारहाणीचा प्रकार घडला आहे. ही घटना कधी घडली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हिडिओत पुढील रांगेत बसलेला प्रवासी मागील प्रवाशाची कॉलर पकडून त्याला मारहाण करत असल्याचे आणि त्यानंतर दुसरा प्रवासीही त्याला ठोसे लगावत असल्याचे दिसून येते. दोघांमधील भांडण रोखण्याचा प्रयत्न विमानातील कर्मचारी करत होते. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 17 हजारांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. युजर्स या घटनेला गंभीर समस्या मानत आहेत.