उत्कृष्ट विद्यार्थी-विद्यार्थिनीचा सन्मान
प्रतिनिधी /बेळगाव
ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएसई विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा पासिंग आऊट परेड कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. शिल्पा कोडकिणी उपस्थित होत्या.
प्रारंभी दीपप्रज्वलन झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रार्थना व स्वागतगीत सादर केले. पाहुण्यांच्या हस्ते गतवषीचा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून धनंजयसिंग गेहलोत व यावषीची उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून श्रावणी गुंजीकर यांना सन्मानित करण्यात आले. विविध विषयात व स्पर्धांमध्ये बक्षीस मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
प्रशासक डॉ. वेलींग यांनी विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडण्याची शपथ देवविली. श्रावणी गुंजीकर यांनी दिया भाला या वषीच्या गटप्रमुख विद्यार्थिनीला मशाल सोपविली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये समूहगीत, गायन, फॅशन शो, समूह नृत्य यांचा समावेश होता.
जे करावयाचे आहे ते आनंदाने करा
डॉ. कोडकिणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, तुम्हाला जे करावयाचे आहे ते आनंदाने करा आणि छंद जोपासा, सर्वोत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करा. स्वतःचे उद्दिष्ट स्वतः निवडा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
सूत्रसंचालन जुई चंदगडकर व दिया भाला यांनी केले. पाहुण्यांची ओळख निरंजन चिंचणीकर याने करून दिली. सान्वी तुळपुले हिने आभार मानले. याप्रसंगी शाळेचे विश्वस्त, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.