वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
येथे सुरू असलेल्या एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील सिटी खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसिका पेगुला व टेलर फ्रीझ यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त झाले.
या स्पर्धेत पावसाचा अडथळा आल्याने इटलीच्या सॅकेरीचा सामना दोनवेळा अर्धवट स्थितीमध्ये थांबवावा लागला होता. दरम्यान तिने या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पेगुलाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. 2019 साली या स्पर्धेत पेगुलाने महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले होते. मात्र यावेळी तिला उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला. अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या तृतीय मानांकित गॉफने सॅमसोनोव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. दरम्यान पुरुष एकेरीत अमेरिकेच्या टेलर फ्रीझला उपांत्य सामन्यात हार पत्करावी लागली आहे.