वृत्तसंस्था/ केपटाऊन
दक्षिण आफ्रिकेत सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या लंकन महिला संघातील यष्टीरक्षक अनुष्का संजीवनी हिने आयसीसीच्या शिस्तपालन नियमांचे उल्लंघन केल्याने तिला सामना मानधनातून 15 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. या स्पर्धेतील गेल्या रविवारी लंका आणि बांगलादेश यांच्यातील सामने संजीवनीकडून मैदानावर बेशिस्त वर्तन घडले होते.
गेल्या रविवारच्या सामन्यात संजीवनीने बांगलादेशच्या खेळाडूविरुद्ध काही अपशब्द वापरले गेले. तसेच तिच्याकडून विचित्र हावभाव पाहावयास मिळाले. संजीवनीकडून पहिल्यांदाच हा गुन्हा घडल्याने तिला आयसीसीच्या शिस्तपालन समितीने दोषी ठरवून 15 टक्के रक्कम दंड म्हणून केली आहे. बांगलादेशच्या डावातील 10 वे षटक सुरू असताना ही घटना घडली होती. संजीवनीने आयसीसीच्या पॅनेलसमोर आपला गुन्हा मान्य केल्याने तिला समज देऊन दंड करण्यात आला.