चीनमधील दुर्घटनेत 13 जखमी ः आरोपी कारचालकाला अटक
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनमध्ये एक बीएमडब्ल्यू कारने रस्ता ओलांडणाऱया लोकांना चिरडले आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले आहेत. तसेच टक्कर मारल्यावर कार चालक नोटा बाहेर फेकत असताना दिसून आला आहे. ही घटना ग्वांगझोऊ शहरात घडली असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी एका 22 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. रस्ता ओलांडणाऱया लोकांना चिरडून कार भरधाव वेगाने निघून गेल्याने खळबळ उडाल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे. संबंधित आरोपी हा गुआंग्डोंग प्रांताच्या कम्युनिस्ट पार्टीच्या सचिवाचा नातेवाईक असल्याचे समारे आले आहे. जखमींमध्ये महिला आणि मुलांचा समावेश असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.