प्रतिनिधी/ बेळगाव
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या मेकॅनिकल विभागामध्ये सहप्राध्यापक म्हणून काम करणारे प्रसाद उदय रायकर यांना विद्यापीठाने पीएचडी पदवी दिली आहे. त्यांनी ‘टेक्निकल इंटरव्हेन्शन इन टू कॅरेक्टराझेशन अँड प्रोसेसिंग ऑफ म्युनिसिपल सॉलिड वेस्ट टुवर्ड्स इकॉलॉजिकल फ्रेंडली डिस्पोजल ऑफ वेस्ट’ हा प्रबंध सादर केला. त्यांना हुबळी येथील भूमरेड्डी कॉलेजचे डॉ. प्रशांत रेवणकर यांचे मार्गदर्शन लाभले.