ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आयएसआच्या निशाण्यावर असून, त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवडय़ात गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना मोदींवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो. मोदींवर हल्ला करण्यासाठी दहशतवादी रॅली किंवा रोड शोमध्येही एन्ट्री घेऊ शकतात. हे दहशतवादी पोलिसांच्या गणवेशातही मोदींच्या कार्यक्रमस्थळी आत्मघाती हल्ला करू शकतात, असे गुप्तचर यंत्रणांकडून सांगण्यात आलं आहे. एवढेच नाही तर काही दहशतवादी लष्कर तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संपर्कातही असल्याचा दावा करण्यात आला आहे.
अधिक वाचा : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव, रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
गुप्तचर यंत्रणांनी लष्कर-ए-तैयबाचे संभाषण रेकॉर्ड केले आहे, त्यानंतरच ही माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट जारी करण्यात आला असून, मोदींची सुरक्षा वाढवली जाऊ शकते.