लखनौमधील ऊग्णालयात आयसीयूमध्ये उपचार
वृत्तसंस्था /लखनौ
कवी मुनव्वर राणा यांची प्रकृती खालावली आहे. लखनौ येथील अपोलो ऊग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले असून सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांची मुलगी सुमैया राणा हिने बुधवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. ‘कृपया माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा. ते सध्या जीवघेण्या आजारांशी लढा देत आयसीयूमध्ये दाखल आहेत. वडिलांसाठी प्रार्थना करा…’ अशी पोस्ट त्यांची कन्या सुमैया राणाने लिहिली आहे.